मुंबई: ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमांतर्गत ‘युवा संगम’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पुढील महिन्यात ‘युवा संगम’ हा कार्यक्रम भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (आयआयटी, मुंबई) येथे आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ३५ तरुण, दादरा- नगर हवेली, दमण-दीव येथील १० तरुण पंजाबमधील ४५ तरुण तसेच एनआयटी, जालंधर येथील तरुण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-काँग्रेस-ओब/
‘युवा संगम’ या कार्यक्रमात १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांना भाग घेता येणार आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी अंतिम मुदत ही ९ एप्रिल २०२३ पर्यंत असून https://ebsb.aicte-india.org या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आयआयटी, मुंबईचे निदेशक प्रा. शुभाशिस चौधुरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
युवा संगम’ या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील तरुणांमध्ये संवाद व्हावा असून त्यासाठीच हा उपक्रम सुरू करण्यातआला आहे. या कार्यक्रमात २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एक हजार तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यटन, परंपरा, प्रगती, व्यावसायिक, तंत्रज्ञान आणि परस्पर संपर्कावर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार आयआयटी मुंबई येथे पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पंजाबमधील ४५ तरुण सहभागी होतील. याशिवाय महाराष्ट्रातील ३५, दादरा- नगर- हवेली, दमण- दीव येथील दहा तरुण एनआयटी जालंधर येथे जातील. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य सरकारचे सहकार्य लाभत असल्याचे निदेशक प्रा. चौधुरी यांनी म्हटले आहे.



[…] मुंबई : राज्यात समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्यातील 646 शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण ही योजना कार्यरत आहे. त्यासाठी राज्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमार्फत व्यवसाय प्रशिक्षक नियुक्त केले जातात. त्यांना वेळेवर मानधन अदा न केल्यास, अशा संस्थांविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एक-भारत-श्रेष्ठ-भारत-अ… […]